विश्‍वामित्र ऋषींविषयी अश्‍लाघ्य विधान केल्याच्या प्रकरणी सरवर चिश्ती यांच्याकडून क्षमायाचना !

जयपूर (राजस्थान) – मुलगी ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे कितीही मोठ्या व्यक्तीचा पाय घसरतो. विश्‍वामित्र यांचाही पाय घसरू शकतो, असे विधान केल्याच्या प्रकरणी अजमेर दर्ग्याच्या खादिमांची (सेवेकर्‍यांची) संघटना असलेल्या ‘अंजुमन सय्यद जादगान’चे सचिव सरवर चिश्ती यांनी क्षमा मागितली आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे त्यांनी क्षमा मागितली आहे. ‘मी माणूस आहे. माझी जीभ घसरू शकते’, अशी सारवासारवही त्यांनी केली आहे. (इस्लामच्या श्रद्धास्थानांविषयी बोलतांना चिश्ती यांची जीभ घसरली असती का ? हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांच्याविषयी बोलतांनाच त्यांची जीभ कशी घसरते ? – संपादक)

१. सरवर चिश्ती पुढे म्हणाले, ‘‘अजमेर ९२’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याविषयी मी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये मी आरोपींवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती; मात्र ही मुलाखत न दाखवता माझे ‘स्टिंग ऑपरेशन’ (छुप्या पद्धतीने माहिती मिळवणे) करून मी खासगीत बोलतांना केलेले वक्तव्य प्रसारित करण्यात आले. (म्हणजे ‘खासगीत हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी काहीही बोलले, तरी चालते’, असे चिश्ती यांना म्हणायचे आहे का ? अशांची जागा कारागृहात असून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक ! – संपादक) या व्हिडिओमुळे माझ्यावर टीकेची झोड उठली आहे.’’

२. अजमेरमध्ये वर्ष १९९२ मध्ये झालेल्या २०० हून अधिक लैंगिक शोषणांच्या घटनांमध्ये अजमेर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याचे सेवेकरी असणार्‍या चिश्ती घराण्यातील काही मुसलमानांचा हात होता. त्यामुळे मुसलमानांकडून ‘अजमेर ९२’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

३. सरवर चिश्ती यांनी यापूर्वीही हिंदूंच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली आहेत. त्यांचा बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.शी संबंध असल्याचेही समोर आले होते. त्यांचा मुलगा आदिर चिश्ती यानेही हिंदूंच्या देवतांवर अश्‍लाघ्य टीका केली होती.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या ऋषि-मुनींविषयी अश्‍लाघ्य वक्तव्य करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे; मात्र राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे तेथील धर्मांधांचे फावले आहे, हेच खरे !