बरेली (उत्तरप्रदेश) – मार्गात जनरथ बस थांबवून दोन मुसलमान प्रवाशांना नमाजपठण करू देणार्या हिंदु चालकाला निलंबित करण्यात आले. यासह वाहक मोहित यादव यांचे कंत्राटच रहित करण्यात आले. विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक दीपक चौधरी यांच्या आदेशावरून बरेली आगाराचे उपविभागीय व्यवस्थापक संजीव श्रीवास्तव यांनी ही कारवाई केली.
नमाज पढ़ने के लिए बीच सड़क पर रुकवा दी जनरथ बस, ड्राइवर सस्पेंड#UttarPradesh | #Bareilly
https://t.co/FG0Gswi0gN— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) June 6, 2023
बरेली आगाराची जनरथ बस सॅटेलाइट बसस्थानकावरून कौशांबीकडे निघाली होती. के.पी. सिंह हे बसचे चालक होते. रात्रीच्या वेळी बरेली सोडल्यानंतर बसचालकाने वाटेत बस थांबवली. काही वेळानंतर प्रवाशांनी बस थांबवण्यामागचे कारण विचारले. यानंतर अन्य प्रवाशांना बसमधील दोन मुसलमान प्रवासी बसमधून उतरून रस्त्याच्या मधोमध नमाजपठण करत असल्याचे दिसून आले. बसमधील उर्वरित प्रवाशांनी यावर आक्षेप घेतला. सत्येंद्र नावाच्या प्रवाशाने याचा व्हिडिओ बनवून सर्वत्र प्रसारित केला. याविषयी टि्वटरच्या माध्यमातून परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे तक्रार केल्यानंतर चालकावर कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|