वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीमध्ये असणार्या श्रृंगार गौरी देवीच्या नियमित पूजेच्या अधिकाराच्या संदर्भातील ‘अंजुमन इंतजामिया कमेटी’ची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. राखी सिंह आणि अन्य ९ महिलांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात पूजेच्या अधिकारासाठी दिवाणी दावा प्रविष्ट केला आहे.
Gyanvapi mosque: श्रृंगार गौरी की नियमित पूजा मामले में कोर्ट ने सुनाया फैसला, मुस्लिम पक्ष की याचिका की खारिज #gyanvapimasjid #uttarpradesh https://t.co/K5jwLyW4TT
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) May 31, 2023
याविरोधात ‘अंजुमन इंतजामिया कमेटी’ने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून ‘हिंदु महिलांच्या याचिकेवर सुनावणी करण्याचा जिल्हा न्यायालयाला अधिकार नाही’, असे म्हटले होते. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे जिल्हा न्यायालयातील खटला चालू रहाणार आहे.