कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण !

पुत्तुरू (कर्नाटक) – काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंटवाल येथील माणी गावात बजरंग दलाचे स्थानिक संचालक महेंद्र आणि भाजपचे प्रशांत नायक यांच्यावरतलवारीने आक्रमण करण्यात आले. यात ते गंभीररित्या घायाळ झाले असून उपचारार्थ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी झालेल्या भांडणाचे पर्यवसान आक्रमणात झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्याचा परिणाम ! कर्नाटकमध्ये आता काँग्रेसची पाकिस्तानी राजवट चालू झाल्याने अशा घटना सतत घडत राहिल्यास आश्‍चर्य वाटू नये ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना आता तरी जाग येईल का ?