(म्हणे) ‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही !’-मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  • कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे संतापजनक विधान !

  • इंदिरा गांधी आणि राजीव गांधी मात्र आतंकवादी आक्रमणात बळी गेल्याचे सिद्धरामय्या यांनी दिले उदाहरण !

कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ आतंकवादाविषयी बोलतात; मात्र आजतागायत आतंकवाद्यांच्या आक्रमणात भाजपचा एकही नेता मेलेला नाही. भाजप सातत्याने सांगत आहे की, काँग्रेस आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे; मात्र आमचे नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आतंकवादी आक्रमणाला बळी पडले आहेत, असे विधान कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २१ मे या दिवशी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केले.

(देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार मारल्यावर सोनिया गांधी रडल्या होत्या, यातून आतंकवाद्यांविषयी कुणाला कळवळा आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • इंदिरा गांधी यांनी खलिस्तान्यांना राजकीय स्वार्थापोटी खतपाणी घातले आणि नंतर ते डोईजड झाल्यावर खलिस्तान्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. तसेच ‘लिट्टे’ संघटनेला इंदिरा गांधी यांनी साहाय्य केले, तर राजीव गांधी तिला नष्ट करू लागल्यामुळेच लिट्टेने राजीव गांधी यांना संपवले, हे काँग्रेसवाले का सांगत नाहीत ?
  • आतंकवादी आक्रमणात कुणाचा बळी गेला किंवा गेला नाही, हे सांगत बसण्यापेक्षा काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत आतंकवाद्यांचा बळी का घेतला नाही ?, याचे उत्तर सिद्धरामय्या यांनी जनतेला दिले पाहिजे !