पाश्‍चात्त्य देशांत अभिव्यक्तीस्वातंत्र्याला सर्वाधिक धोका !

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांचे वक्तव्य

सलमान रश्दी

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाश्‍चात्त्य देशांमध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे. माझ्या संपूर्ण जीवनकाळात एवढा धोका याआधी कधीही नव्हता, असे वक्तव्य जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांनी केले. ‘ब्रिटीश बुक अ‍ॅवॉर्ड’ पुरस्काराच्या कार्यक्रमात ‘फ्रीडम टू पब्लिश’ (प्रकाशनाचे स्वातंत्र्य) नावाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

१. १६ मे या दिवशी आयोजित या कार्यक्रमात अमेरिकेतून ऑनलाईन जोडले गेलेले रश्दी पुढे म्हणाले की, अमेरिकेतील ग्रंथालयांवर आणि शाळांमधील लहान मुलांसाठीच्या पुस्तकांवर होणारी अनाकलनीय आक्रमणे मी पहात आहे. आपल्याला या धोक्याची जाणीव असायला हवी.

२. गेल्या वर्षी १२ ऑगस्ट या दिवशी पश्‍चिम न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात रश्दी व्यासपिठावर असतांना एका व्यक्तीने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत त्यांच्यावर चाकूद्वारे आक्रमण केले होते. त्या वेळी झालेल्या दुखापतीत त्यांच्या एका डोळ्याला कायमचे अंधत्व आले.

३. सलमान रश्दी यांनी वर्ष १९८८ मध्ये इस्लामवर टीका करणारे ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ नावाचे पुस्तक लिहिले होते. त्यामुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. जगभरात त्यांच्या हत्येचे फतवे निघाले होते.

संपादकीय भूमिका

  • भारतामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची आवई उठणार्‍या पाश्‍चात्त्य देशांना आता भारताने या सूत्रावरून जाब विचारला पाहिजे !