आजचे चंद्रग्रहण ‘छायाकल्‍प’ प्रकारचे असल्‍याने ग्रहणाचे वेधादी नियम पाळू नयेत !

श्री. राज कर्वे, ज्‍योतिष विशारद

५ मे २०२३ या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्‍प’ प्रकारचे असणार आहे. ते संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप, रशिया, ऑस्‍ट्रेलिया आदी प्रदेशांत छायाकल्‍प स्‍वरूपात दिसणार आहे.

 छायाकल्‍प चंद्रग्रहण म्‍हणजे काय ?

छायाकल्‍प चंद्रग्रहणात चंद्राचा प्रवास पृथ्‍वीच्‍या दाट छायेतून न होता विरळ छायेतून होतो. त्‍यामुळे चंद्र किंचित् अंधुक दिसतो. छायाकल्‍प ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

– श्री. राज कर्वे, ज्‍योतिष विशारद, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.५.२०२३)