गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्‍म्‍य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्‍याचा भावार्थ !

सर्व सजीव-निर्जीव जग व्‍यापून असलेले आणि सकल प्राणीमात्रांना चेतना देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘स्‍थावरं जङ्‍गमं चैव तथा चैव चराचरम् ।
व्‍याप्‍तं येन जगत्‍सर्वं तस्‍मै श्रीगुरवे नमः ॥ – गुरुगीता, श्‍लोक ७१

अर्थ : ‘पर्वतादी स्‍थावर, सर्व पशू-पक्षी आणि मानवादी चल प्राणीमात्र, असे सर्व सजीव अन् निर्जीव जग ज्‍यांनी व्‍यापले आहे’, त्‍या श्री गुरूंना नमस्‍कार असो.’

भावार्थ : ‘प्रत्‍येक प्राणीमात्राला कार्य करण्‍याची प्रेरणा आणि चेतना प्रदान करणारे श्री गुरु म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आहेत. अंतरात त्‍यांच्‍याप्रती अपार भाव असलेला साधक आपल्‍या भावदृष्‍टीच्‍या बळावर चराचरात व्‍यापलेल्‍या श्री गुरूंच्‍या तत्त्वाची अनुभूती घेऊ शकतो. हे सर्वव्‍यापी तत्त्व अनुभवता येण्‍यासाठी ‘सर्व साधकांमध्‍ये भावदृष्‍टी विकसित व्‍हावी’, अशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी आर्त प्रार्थना !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (४.५.२०२३)