अमरावती – ८ वर्षांपूर्वी अमरावती येथे कार्यरत असलेले तहसीलदार सुरेश बगळे त्यांच्या पथकासह रेती साठ्यावर कारवाईसाठी गेले होते. त्या वेळी २ धर्मांधांनी तहसीलदारांसमवेत वाद घातला. त्याच वेळी एकाने तहसीलदार बगळे यांची कॉलर पकडली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात येथील जिल्हा न्यायाधीश क्रमांक ३ आर्.व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ वर्षाची शिक्षा सुनावली. हा निर्णय न्यायालयाने २९ एप्रिल या दिवशी दिला आहे.
नदीम अश्फाक (वय ५० वर्षे) आणि अब्दुल फिरोज अब्दुल रज्जाक (वय ३८ वर्षे, दोघेही रा. चपराशीपुरा, अमरावती) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २८ ऑगस्ट २०१५ या दिवशी सायंकाळी येथील तत्कालीन तहसीलदार सुरेश बगळे आणि त्यांचे पथक फ्रेजरपुरा ठाण्याच्या क्षेत्रातील गुणवंत बाबा मंदिराजवळ असलेल्या वाळू साठ्याची पडताळणी करण्यासाठी गेले होते. या वेळी पंचनामा करत असतांना एक ट्रक त्या ठिकाणी उभा होता, तसेच अब्दुल फिरोज उपस्थित होता. तहसीलदार बगळे यांनी त्याला वाळूच्या परवान्याविषयी विचारणा केली असता त्याने नदीम अशफाक याला त्या ठिकाणी बोलावले. नदीम अशफाक याने बगळे यांना परवाना दाखवला; मात्र त्या पंचनाम्याची मुदत काही घंट्यांपूर्वीच संपली होती. त्यामुळे तहसीलदारांनी वाळू आणि ट्रक जप्त केला होता.
संपादकीय भूमिकास्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |