या खात्यांवरून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येत असल्याचा भाजपचा आरोप

बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेसच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांवर बंदी घालावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेश समितीचे प्रमुख डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात तक्रारही केली आहे.
१. भाजपच्या खासदार शोभा करंद्लाजे यांनी म्हटले की, वर्ष २०२२ मध्ये तेलंगाणातील नलकोंडा येथे एक घटना घडली होती. त्या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करून ‘ही घटना कर्नाटकातील आहे’, असे काँग्रेसकडून दाखवण्यात येत आहे. यातून काँग्रेसच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांनी विश्वासार्हता गमावली असल्याने त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे.
२. करंद्लाजे पुढे म्हणाल्या की, हुब्बळ्ळी येथे डी.के. शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती. त्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही पत्रकार परिषद होती. त्या वेळी शिवकुमार यांच्या पत्रकार परिषदेतून पत्रकार निघून गेले होते. ‘या पत्रकारांची तक्रार करतो’, अशी धमकी त्यांनी दिली होती. या प्रकरणीही शिवकुमार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर