(म्हणे) ‘पोलिसांच्या उपस्थितीत हिंदु अतिरेक्यांनी अतिक आणि अश्रफ यांची हत्या केली !’ – बहरीनच्या संसदेत उपस्थित सूत्र

इस्लामी देश बहरीनच्या संसदेत उपस्थित करण्यात आले अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचे सूत्र

नवी देहली – आखाती देशांपैकी एक असणार्‍या बहरीनच्या संसदेत उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येचे सूत्र उपस्थित करण्यात आले. अहमद कराता या खासदाराने म्हटले की, अतिक अहमद आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या कह्यात होता. पोलिसांच्या उपस्थितीत हिंदु अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना निषेधार्ह आहे. आम्ही बहरीन आणि अन्य आखाती देशांमध्ये भारतियांशी सन्मानाने वागतो; मात्र दुसरीकडे भारतात जे काही मुसलमानांच्या संदर्भात होत आहे, ते अस्वीकारार्ह आहे. मुसलमानांच्या रक्तापात रोखण्याचा निर्णय घ्यायला हवा.

दुसर्‍या एका खासदाराने संसदेत म्हटले की, अतिक अहमद याने एक मासांपूर्वीच तक्रार केली होती की, त्याच्या जिवाला पोलिसांपासून धोका आहे. आता आम्ही पोलिसांच्या उपस्थितीत त्यांची हत्या होतांना पाहिले. जेव्हा मुसलमानांची गोष्ट येते, तेव्हा आम्ही या घटना परत परत होतांना पहात आहोत. अनेक व्हिडिआेंमध्ये मुसलमानांच्या हत्या होतांना दाखवण्यात आले आहे. मशिदी तोडणारे आणि दुर्बल लोकावर आक्रमण करणारे यांना पोलीस पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला.

संपादकीय भूमिका

  • भारताच्या अतंर्गत घटनांमध्ये बहरीनने नाक खुपसू नये, असे भारत सरकारने बहरीनला खडसावले पाहिजे !
  • बहरीनने कधी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या होणार्‍या वंशसंहारांविषयी तोंड उघडले आहे का ? काश्मीरमध्ये हिंदूंना ठार करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडण्यात आले, तेव्हा कधी विरोध केला होता का ?
  • अतिक आणि त्याचा भाऊ कुख्यात गुंड होते. त्यांनी काही हिंदूंच्या हत्या केल्या होत्या. अशा गुंडांची बाजू घेणार्‍या बहरीनची मानसिकता यातून लक्षात येते !