दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पत्रकारिता करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले बाळकडू आणि अनुभवलेली त्यांची कृपा  !

दैनिक ‘सनातन प्रभात’ला यावर्षी २ तपे (२४ वर्षे) पूर्ण होत आहेत. मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. गुरुकृपेने मला वर्ष २००२ ते वर्ष २००६ या कालावधीत दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून सेवा करण्याची सुसंधी लाभली. पुढे वर्ष २०१५ पर्यंत संपादकीय विभागात सेवा करतांना मला अखंड गुरुकृपेची अनुभूती घेता आली. ही सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’ने माझ्यावर केलेले हिंदुत्वाचे संस्कार, त्यामुळे झालेला अलभ्य आध्यात्मिक लाभ आणि अपार गुरुकृपा इत्यादींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेख श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

या प्रसंगांत ‘सनातन प्रभात’चा अन्य कुणीही वार्ताहर असता, तरी सर्व प्रसंगांचा समाजमनावर झालेला परिणाम पालटला नसता; कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प ‘सनातन प्रभात’च्या जन्माच्या वेळीच झाला आहे !

संकलक : श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. सागर निंबाळकर

१. वार्ताहर कसा झालो ?

वर्ष २००१ नंतर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहर साधकांपैकी काहींना वैयक्तिक समस्या आल्यामुळे ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन उत्तरदायी साधकांनी मला वार्ताहरसेवा करण्याविषयी सुचवले. तेव्हा त्यांनी साधनेच्या अनुषंगाने सांगितलेल्या सूत्रांपैकी काही सूत्रे येथे देत आहे.

अ. तुला वार्ताहर म्हणून वृत्ते मिळवण्यापुरती मर्यादित सेवा करायची नाही, तर तुला जनसंपर्क वाढवण्याची व्यापक सेवाही करायची आहे.

आ. वृत्त गोळा करतांना माणसेही जोडायची आहेत.

इ. समाजाकडून साधना करून घेण्यासाठी वृत्तसेवेचा उपयोग करायचा. या सूत्रांचा उपयोग मला वार्ताहर म्हणून साधना करण्यासाठी झाला. वार्ताहर सेवेसह शासकीय अधिकार्‍यांना साधना सांगणे, सनातनविषयीचे समाजातील अपसमज दूर करणे इत्यादी सेवा मला करता आल्या.

करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्याशंकरभारती यांचे आशीर्वाद घेताना प.पू. डॉ. जयंत आठवले

२. वृत्तसेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लाभलेले प्रत्यक्ष मार्गदर्शन !

२ अ. ११.१०.२००२ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संतबैठकीच्या वेळी छायाचित्रे काढण्याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे : ११.१०.२००२ या दिवशी कोल्हापूर शहरातील जगद्गुरु शंकराचार्य पिठामध्ये (मठामध्ये) जिल्ह्यातील संत जमणार होते. तेथे जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्याशंकरभारती, अनंत श्री विभूषित रामानंदाचार्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. तोडकर महाराज, प.पू. मुंगळे महाराज, प.पू. भानुदास महाराज यादव यांच्यासह सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही होते. वृत्तसंकलनासह छायाचित्रे काढण्याची सेवा मला करायची होती. सनातनच्या साधिका सौ. नंदिनी हर्षे (पूर्वाश्रमीच्या कु. मीनाक्षी चव्हाण) यांनी मला त्यांचा ‘कोडॅक’चा छोटा छायाचित्रक (कॅमेरा) कसा वापरायचा ते शिकवले आणि तो मला दिला.

१. मठामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला ‘छायाचित्रे काढतांना कुठे उभे रहावे ?’, ‘कोणत्या कोनातून छायाचित्र चांगले येईल ?’, ‘किती उंचीवर छायाचित्रक धरावा ?’, इत्यादी गोष्टी संतबैठकीत बसूनच मधेमधे वेळ मिळेल तसे सांगत होते.

२. तेथे सनातनच्या ‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार’ या ग्रंथाचे प्रकाशन जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्याशंकरभारती यांच्या हस्ते झाले. छायाचित्र नीट यावे, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतः जगद्गुरु शंकराचार्यांना ‘त्यांचा स्वत:चा चेहरा झाकला जाणार नाही’, अशा प्रकारे ग्रंथ धरण्याची प्रार्थना केली. असे करायचे असते, हेही मला ठाऊक नव्हते; मात्र मी न सांगताच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सर्वकाही समजले होते.

३. विविध प्रसंगांचे वृत्तसंकलन करतांना वैचारिक दृष्टीकोन निर्माण होऊन त्याप्रमाणे लिखाण करता येणे

३ अ. २२.२.२००४ – मदरशाचे रूपांतर मशिदीत करण्याचे प्रयत्न हाणून पाडणे ! : कोल्हापूर शहरातील फुलेवाडीजवळील नागदेववाडी या गावात धर्मांधांकडून अवैधरित्या एका मदरशाचे रूपांतर मशिदीत करण्याचे प्रयत्न चालू होते. स्थानिक हिंदूंमध्ये धर्मांधांचे भय (दहशत) वाढत होते. स्थानिक हिंदूंमध्ये ऐक्य होते; पण त्यांना मदरशात प्रवेश करता येत नव्हता. स्थानिक हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री राजू मोरे, सागर घाटगे आणि मंगेश पाटील यांनी मला या मदरशामुळे निर्माण झालेली समस्या सांगितली. त्यांच्याकडे मदरशाशी संबंधित सर्व कागदपत्रेही होती. मी कागदपत्रांची निश्चिती केली. स्थानिक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या, धर्मांधांचे भय निर्माण करण्याची पद्धत इत्यादी समजून घेतले. मी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे एकदा त्या मदरशात गेलो. खरेच तेथे नमाजपठण होते का ? याची निश्चिती केली. त्यानंतर वस्तूस्थितीची माहिती देणारा लेख लिहिला. श्री. घाटगे आणि श्री. मोरे यांनी दैनिकाच्या १ सहस्र अंकांसाठी प्रायोजक मिळवले. २२ फेब्रुवारीला रविवार होता. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पुरवणीत लेख प्रसिद्ध झाला. सकाळी लवकर मी आणि एक साधक जाऊन १ सहस्र अंक श्री. घाटगे यांना दिले. श्री. मोरे आणि श्री. घाटगे यांनी ते अंक स्थानिकांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने वितरित केले. दैनिकाचे काही अंक अनेक धर्मांधांनाही मिळाले होते.

दुपारी १२ वाजता इसाक मुजावर (तेव्हाचे वय ५४ वर्षे) फुलेवाडी येथील बसथांब्यावर उभा होता. तेथे २ हिंदु तरुण या लेखाविषयी चर्चा करत होते. ते ऐकून तो मुसलमान चिडला. त्याने ‘सनातन प्रभात’चा अंक फाडला आणि हिंदु तरुणांना, ‘या लेखामुळे आमच्या मदरशाला काही झाले, तर तुमचे श्री महालक्ष्मी मंदिरच बाँबने उडवून देतो !’, असे धमकावले. या विधानामुळे त्या हिंदु तरुणांनी मुजावरला तेथेच चोप दिला. श्री महालक्ष्मी मंदिराविषयीचे मुजावरचे विधान म्हणजे सर्व कोल्हापूरकरांच्या श्रद्धेवरील आक्रमण होते. त्यामुळे विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदू एकता आंदोलन इत्यादी संघटनांच्या प्रमुखांसह शेकडो हिंदू जमले. त्यांनी ठिय्या आंदोलन करून मुजावरला पकडण्याची आणि मदरसा बंद करण्याची मागणी केली.

वरील प्रसंग मला ठाऊक नव्हता. मी सायंकाळी महानगरपालिकेत गेलो होतो. तेथे मला २-३ वार्ताहरांनी हा प्रसंग सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘संकलक म्हणून या लेखाला तुझे नाव आहे. धर्मांध तुला शोधत आहेत. तू ४-५ दिवस बाहेर फिरू नकोस.’ मी याचे वृत्त दैनिक कार्यालयात पाठवले. दैनिक कार्यालयातूनही मला लेख आवडल्याचे सांगण्यात आले.

पुढे ७ मार्चला ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी त्या मदरशाच्या विरोधात ठराव संमत केला आणि ७ एप्रिलला त्या मदरशाला कायमचे कुलूप लावण्यात आले. केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या ऐक्यामुळेच या लढ्यात हिंदूंचा विजय झाला.

३ आ. १४.४.२००५ – तथाकथित परिवर्तनवाद्यांच्या विचारांचे खंडण करणारे लेख लिहिता येणे : ५ एप्रिल २००५ या दिवशी जगद्गुरु शंकराचार्य मठामध्ये आदि शंकराचार्यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. काही डाव्या विचारांच्या वार्ताहरांनी ‘जगद्गुरु स्वामी श्री विद्याशंकरभारती यांचे भाषण आणि ते स्वतः लोकशाहीविरोधी आहेत’, असा अपप्रचार चालू केला. त्याला डाव्या विचारसरणीच्या काही कथित परिवर्तनवादी नेत्यांनी उचलून धरले. कोल्हापूरमध्ये हिंदुविरोधी अपप्रचार चालू केला. त्याचे खंडण मी माझ्या परीने दैनिक ‘सनातन प्रभात’मधून करत होतो. डाव्या विचारांच्या लोकांनी १४ एप्रिल २००५ या दिवशी शंकराचार्य मठावर मोर्चा काढायचे ठरवले. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून करण्यात आलेली जागृती आणि हिंदु जनजागृती समितीचे कृतीशील नेतृत्व यांमुळे हिंदुत्वनिष्ठांचेही मोठे संघटन झाले. हिंदुत्वनिष्ठांनी घोषित केले, ‘डाव्या आघाडीचा मोर्चा जर कोल्हापूरमधील बिंदू चौक येथून शंकराचार्य मठावर येणार असेल, तर शंकराचार्य मठातून हिंदू निघतील आणि बिंदू चौक येथे मोर्चा घेऊन येतील. जगद्गुरु शंकराचार्य हिंदूंची अस्मिता आहेत. त्यांच्या विधानाचा विपर्यास करून त्यांचा अवमान करणे बंद करावे !’ दोन्ही बाजूंनी पत्रकार परिषदा झाल्या. डाव्या विचारांचे वार्ताहर अधिक असल्याने ते तथाकथित परिवर्तनवादी नेत्यांच्या सूत्रांना मोठी प्रसिद्धी देत होते.

दिवसभर मोर्च्याशी संबंधित प्रत्येक वृत्त गोळा करतांना डाव्या आघाडीची अन्य वृत्तपत्रांतील सर्व सूत्रे मी एकत्र केली होती. त्यांचा प्रतिवाद करणारे लहान-लहान लेख मीही त्याच दिवशी लिहून मिरज येथील दैनिक कार्यालयात पाठवत होतो. १३ एप्रिललाही असाच तथाकथित परिवर्तनाद्यांच्या विचारांचे खंडण करणारा लेख माझ्याकडून लिहिला गेला. त्यातील एक वाक्य आजही मला आठवते. ते असे होते, ‘जगद्गुरु शंकराचार्यांच्या विधानाचा विपर्यास म्हणजे, परिवर्तनवाद्यांच्या सुपिक डोक्यातील भ्रामक कल्पना आहे.’ मी यापूर्वी कधीही असे चपखल लिखाण केले नव्हते.

१४ एप्रिलला लेख प्रसिद्ध झाला. समितीच्या कार्यकर्त्यांनी शंकराचार्य मठात जमलेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये १०० अंक वितरित केले. मी मठात मोर्च्याच्या वृत्तसंकलनासाठी गेलो होतो. दुसरा वार्ताहर साधक परिवर्तनवाद्यांच्या मोर्च्याच्या ठिकाणी गेला होता. लेख वाचून काही हिंदुत्वनिष्ठांनी लेखाचे कौतुक केले. एक-दोन पुरोगामी विचारसरणीच्या वार्ताहरांनीही मला लेख चांगला असल्याचे भ्रमणभाषवर कळवले. दैनिक कार्यालयातूनही माझ्या लेखाचे कौतुक करण्यात आले.

हिंदुत्वनिष्ठांच्या निर्धारामुळे पोलिसांनी तथाकथित परिवर्तनवाद्यांचा मोर्चा मठापासून दूर १ किलोमीटर अंतरावरच अडवला. एक प्रकारे हा हिंदुत्वनिष्ठांचा मोठा विजयच होता. – (क्रमश:) श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२३)

प.पू. तोडकर महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती अपार कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यातून साधकाला दायित्वाची जाणीव होणे

कोल्हापूर येथील हनुमानभक्त सद्गुरु श्री तोडकर महाराज यांच्याशी अध्यात्माविषयी चर्चा करताना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जानेवारी २००५ मध्ये कोल्हापूर येथील हनुमानभक्त भक्तवत्सल सद्गुरु श्री तोडकर महाराज (प.पू. तोडकर महाराज) यांना काही तरुणींचा विनयभंग केल्याचे कारण पुढे करून षड्यंत्रपूर्वक अटक झाली. तेव्हा मी मिरज येथील सनातनच्या आश्रमात एका साधना शिबिरात सहभागी झालो होतो. मला संपादकीय विभागातून प.पू. तोडकर महाराजांशी संबंधित प्रसंगात वृत्तसंकलनासाठी कोल्हापूर येथे जायला सांगण्यात आले, त्याप्रमाणे मी गेलो.

कोल्हापूर येथील सर्व वृत्तपत्रांमध्ये प.पू. महाराजांच्या विरोधात लिखाण येत होते. तेव्हा केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प.पू. तोडकर महाराज निर्दाेष असल्याचे सुस्पष्टतेने प्रसिद्ध करण्यात येत होते. (पुढे न्यायालयातही तेच स्पष्ट झाले.) प.पू. महाराजांना मी भेटलो. ते म्हणाले, ‘‘समस्त संतांमध्ये केवळ प.पू. डॉक्टरांनी (प.पू. महाराज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रेमपूर्वक ‘प.पू. डॉक्टर’ असे संबोधायचे. – संकलक) मला भ्रमणभाष करून धीर दिला. त्यांचे चरण कधीही सोडू नकोस.’’ प.पू. महाराजांच्या डोळ्यांतून या वेळी कृतज्ञतेचे अश्रू वहात होते. ते पाहून मीही धन्य झालो. ‘आपल्या गुरूंच्या संदर्भात एका अन्य संतांना जेवढी कृतज्ञता वाटते, तशीच कृतज्ञता मलाही वाटायला हवी. त्यासाठी प.पू. महाराजांवरील प्रत्येक आरोप परतवून लावण्याची सेवाच जणू देवाने मला दिली आहे’, असे वाटले. त्यानंतर मी देवाला पुष्कळ प्रार्थना करू लागलो. प.पू. महाराजांवर वर्तमानपत्रांतून केलेल्या सर्व टीकांची कात्रणे जमवली. प्रतिदिन त्यांचे खंडण दैनिक कार्यालयात पाठवू लागलो. हे खंडण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून त्या-त्या दिवशी प्रसिद्ध केले जात होते. यातून ‘प.पू. महाराजांवरील आरोप, ही अफवा कशी आहे ?’ हे जनमानसापर्यंत पोचवण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’ यशस्वी झाले.

पोलीस प.पू. तोडकर महाराज यांना न्यायालयात नेत असतांना मी वार्ताहर म्हणून नेहमी त्यांच्या समवेत जात असे. तेव्हा प.पू. महाराज माझे निरीक्षण करत असत. पुढे प.पू. महाराज जामिनावर मुक्त झाले. त्यानंतर मी त्यांना भेटायला त्यांच्या द्रोणागिरी आश्रमात गेलो. तेव्हा प.पू. महाराजांनी मला छातीशी कवटाळले. डोक्यावरून हात फिरवला. तोंडात पेढा भरवला. ते अन्य भक्तांना म्हणाले, ‘‘हा बघा, सर्व वार्ताहरांमध्ये हा एकमेव आपला वार्ताहर होता. सगळे वार्ताहर कितीही दंगा घालत असले, उलटसुलट प्रश्न विचारत असले किंवा खोटे लिहीत असले, तरी सागर शांत बसून त्याच्या सेवेकडे लक्ष देत असे. ‘आपल्यावरील आरोपांना कसे वैचारिकदृष्ट्या परतवून लावायचे ?’, ते सागरने दाखवून दिले. असे उत्तम साधक प.पू. डॉक्टरांनी सिद्ध केले आहेत. प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे !’’ प.पू. महाराजांचे हे शब्द मला नेहमी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे चरण मानसरित्या घट्ट पकडून ठेवण्यासाठी साहाय्य करतात.

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२३)

दैनिक‘सनातन प्रभात’चा आणि आम्हा साधकांचा रक्तगट एकच : भगवा !

‘सनातन प्रभात’च्या हिंदुत्वाच्या बाळकडूमुळे माझ्यासारख्या साधकांचा आणि ‘सनातन प्रभात’चा रक्तगट एकच झाला आहे. तो म्हणजे ‘भगवा’, म्हणजेच ‘हिंदुत्वनिष्ठ’ ! – श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२३)