मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून अल्पवयीन हिंदु मुलीशी केला विवाह !

गोरखपूरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

आरोपी अब्दुल कल्लू

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. स्वतःचे धर्म आणि नाव लपवून एका मुसलमान तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीला त्याच्या जाळ्यात अडकवले आणि खोटे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून शोध चालू केला आहे.

१. पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, अब्दुल कल्लू नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे खोटेच सांगून २ वर्षांपूर्वी मैत्री केली. विविध आमिषे दाखवून अब्दुल याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने तिला धमकावत तिच्याशी लग्न केले. पुढे तो तरुण मुसलमान असल्याचे समोर आल्यानंतर त्याने पीडित मुलीवर धर्मांतरासाठी दबाव टाकायला चालू केले.

२. एक दिवस संधी साधून पीडित मुलगी पळून तिच्या वडिलांच्या घरी आली. तिने सर्व घटना घरच्यांना सांगितली. त्यानंतर तिच्या वडिलांनी खजनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.