पुण्‍याचे माजी महापौर मोहोळ यांच्‍या नावे खंडणी मागणार्‍या दोघांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्‍या नावाने एका बांधकाम व्‍यावसायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी कोल्‍हापूर येथील संदीप पाटील आणि पुणे येथील शेखर ताकवणे यांना गुन्‍हे शाखेने सापळा लावून अटक केली आहे. या प्रकरणी एका बांधकाम व्‍यावसायिकाने कोथरूड पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली होती.

आरोपींनी २ दिवसांपूर्वी पौड रस्‍त्‍यावरील बांधकाम व्‍यावसायिकाकडे भ्रमणभाषवर संपर्क साधून मुरलीधर मोहोळ आणि त्‍यांच्‍या मावसभावाचा उल्लेख करत ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. बांधकाम व्‍यावसायिक हे मोहोळ यांचे मित्र आहेत. बांधकाम व्‍यावसायिकाने या प्रकाराची माहिती मोहोळ यांना दिली होती. मोहोळ यांनी याविषयीची माहिती सहपोलीस आयुक्‍त संदीप कर्णिक यांना दिली आणि पोलीस आयुक्‍त अमोल झेंडे यांना या गुन्‍ह्याचे अन्‍वेषण करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या.

संपादकीय भूमिका

गुन्‍हेगारांना कायद्याचे भय नसल्‍याचा परिणाम !