हडपसर (जिल्हा पुणे) – कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार रामटेकडी येथे १९ मार्च या दिवशी गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने टेंपो पकडला. टेंपोमध्ये ३ गायी आणि २ गीर जातीच्या गायी असे एकूण ५ गोवंश दाटीवाटीने क्रूरपणे जखडून बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. या प्रकरणी टेंपोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून गोवंशियांनी हडपसर येथील धर्मवीर संभाजी महाराज गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले आहे. टेंपो पकडण्यासाठी शादाब मुलाणी, मंगेश चिमकर, निखिल दरेकर, आेंकार जाधव, सार्थक वर्धेकर यांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच हडपसर पोलीस ठाण्यामधील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही उत्तम सहकार्य केले.
संपादकीय भूमिकादेशातील २९ राज्यांपैकी २२ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा असतांना देशभरात दिवसाढवळ्या गोहत्या चालू आहेत. केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्या गोहत्या कधी थांबतील का ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी सरकारने गोहत्याया बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून सर्व अवैध पशूवधगृहे बंद करावीत ! |