जनतेचा विरोध डावलून इस्रायल सरकारकडून न्याययंत्रणेशी संबंधित कायदा संमत

आता नेतान्याहू यांना त्यांच्याविरुद्धचा खटला चालू असेपर्यंत पदावर रहाता येणार

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (डावीकडे)

तेल अविव – न्याययंत्रणेमध्ये आमूलाग्र पालट करणारा कायदा इस्रायलच्या कायदेमंडळाने २३ माचला ६१ विरुद्ध ४७ मतांनी संमत केला. या कायद्यामुळे आता पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचा खटला चालू असेपर्यंत पदावर रहाता येणार आहे. या कायद्याला जनतेचा तीव्र विरोध होता; परंतु नेतान्याहू सरकारने हा विरोध डावलून कायदा अस्तित्वात आणला. पंतप्रधान झाल्यानंतर नेतान्याहू यांनी त्यांच्या पदाआड येणारे कायदे पालटण्याची घोषणा केली होती.

‘नेतान्याहू सरकारची नवी धोरणे देशातील लोकशाही मूल्यांचे हनन करणारी आहेत’, अशी टीका इस्रायलमधील लोकशाहीवादी नेत्यांनी केली आहे.