आनंदी, सर्वांशी जवळीक साधणारे आणि कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब (वय ४० वर्षे) !

श्री. रामानंद परब

वर्ष २०२१ मध्‍ये श्री. रामानंद परब यांची आई रुग्‍णाईत असतांना ते कुडाळ सेवाकेंद्रात रहात होते. त्‍या कालावधीत मला लक्षात आलेली रामानंददादांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

१. आनंदी

‘श्री. रामानंददादांकडे बघितल्‍यावरच मला पुष्‍कळ आनंद होतो. दादांशी बोलतांनाही मला आनंद अनुभवता येतो. त्‍यांची आई रुग्‍णाईत असतांना त्‍यांच्‍या चेहर्‍यावर ताण जाणवत नव्‍हता. त्‍यांच्‍या चेहर्‍यावर प्रसन्‍नता जाणवते.

कु. पूजा धुरी

२. प्रेमभाव

दादा सेवाकेंद्रात आलेल्‍या प्रत्‍येक साधकाशी आपुलकीने बोलतात. ते अनोळखी व्‍यक्‍तींची स्‍वतःहून ओळख करून घेतात. ते साधकांना सेवेत साहाय्‍य करतात. ‘दादा सर्वांशी लगेच जवळीक साधतात’, यातून त्‍यांचा भाव दिसून येतो.

३. इतरांचा विचार करणे

आम्‍ही (मी आणि एक साधिका) दादांच्‍या आईच्‍या सेवेत होतोे. दादा आवश्‍यकतेनुसार आम्‍हाला बोलवत होते. आई उठल्‍या की, दादा लगेच येत होते.

४. आईची मनोभावे सेवा करणे

दादांच्‍या आईंना रात्रीच्‍या वेळेस त्रास होत असल्‍यास त्‍या रात्रभर जाग्‍या असायच्‍या. त्‍या वेळी रामानंददादा आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. श्रावणी हे दोघेही रात्रभर जागे असायचे. एकदा त्‍यांना सलग पाच रात्री जागरण झाले, तरीही त्‍यांच्‍या तोंडवळ्‍यावर जराही ताण नव्‍हता. ते दोघे दिवस-रात्र एक करून आईंची काळजी घेत होते. एकदा रात्री आईंना पुष्‍कळ अस्‍वस्‍थ वाटत होते. त्‍यांना ४ – ५ वेळा प्रसाधनगृहात न्‍यावे लागले. त्‍याही परिस्‍थितीत दादा स्‍थिर होते.

५. कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे

एकदा मी दादांच्‍या आईंना चाकाच्‍या आसंदीवर (‘व्‍हील चेअर’वर) बसवून ध्‍यानमंदिरात नेले. तेवढ्यात तेथे दादा आले. तेव्‍हा त्‍यांच्‍या आईंना आनंद झाला. त्‍या हसू लागल्‍या. त्‍या वेळी दादा सहजच म्‍हणाले, ‘‘एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला म्‍हणाले, ‘‘तुझ्‍यामुळे (रामानंददादांमुळे) आई आनंदी आहे. तेव्‍हा मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना सांगितले, ‘‘परम पूज्‍य, तुमच्‍यामुळेच आई आनंदी आहे.’’ दादांनी लगेच कर्तेपणा परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी अर्पण केला.

६. देवाने ‘रामानंद’ या नावाचा सुचवलेला भावार्थ !

रामानंद = राम + आनंद. रामाच्‍या नामातून जो आनंद मिळवतो, तो रामानंद ! रामाच्‍या नामातच आनंद आहे; म्‍हणून रामानंद आनंदात आहे.

‘दादांमधील सर्व गुण मला आत्‍मसात करता येऊ देत’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

– कु. पूजा दीपक धुरी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (११.५.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक