गोरक्षक मोनू मानेसर यांचे नाव ‘वॉन्‍टेड’ सूचीतून वगळले !

२ मुसलमानांच्‍या हत्‍येचे प्रकरण

(वॉन्‍टेड म्‍हणजे हवे असलेले)

गोरक्षक मोनू मानेसर

चंडीगड – हरियाणातील भिवानी येथे राजस्‍थानमधील २ मुसलमानांना जाळून ठार मारल्‍याच्‍या प्रकरणी राजस्‍थान पोलिसांनी ‘वॉन्‍टेड’ सूचीतून गोरक्षक मोनू मानेसर आणि लोकेश सिंगला यांची नावे वगळली आहेत. पोलिसांनी ९ आरोपींची छायाचित्रे प्रसारित केली आसून त्‍यांत श्रीकांत पंडित यांच्‍या नावाचा समावेश आहे. राजस्‍थान पोलिसांनी श्रीकांत पंडित यांच्‍या घरी जाऊन त्‍यांच्‍या गर्भवती पत्नीला मारहाण केल्‍यामुळे त्‍यांना मूल गमवावे लागले होते. या प्रकरणी राजस्‍थान पोलिसांनी ४० पोलिसांच्‍या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्‍ट केला आहे. राजस्‍थान पोलिसांनी मोनू मानेसर यांचे नाव वगळून त्‍यांना  निर्दोष घोषित केल्‍याचे प्रसारमाध्‍यमांचे म्‍हणणे आहे.