पाकच्या काश्मीरविषयक विधानांमुळे ब्रिटनमधील मुसलमानांवर होत आहे परिणाम !

ब्रिटनच्या सरकारचा अहवाल !

लंडन (ब्रिटन) – काश्मीरविषयी पाकिस्तानकडून करण्यात येणार्‍या विधानांमुळे ब्रिटनमधील मुसलमानांवर परिणाम होत आहे. त्यांच्यामध्ये भारतविरोधी भावना भडकवली जात आहे. यासह ब्रिटनमधील खलिस्तानचे समर्थक गट भारतविरोधी खोट्या गोष्टी पसरवत आहेत, यांपासून ब्रिटनने सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे, असे ब्रिटन सरकारने आतंकवाद रोखण्यासाठी बनवलेल्या योजनेच्या करण्यात आलेल्या समिक्षेच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

१. या अहवालामध्ये म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये काही कट्टरतावादी गट लोकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिटनमध्ये पाकिस्तानचा एक मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) काश्मीरमधील हिंसाचारावरून लोकांना भडकावत आहे, असे निदर्शनास आले आहे.

२. याविषयी ब्रिटनचे गृह सचिव म्हणाले की, अहवालातील शिफारसी तातडीने लागू केल्या जातील. कट्टरतावाद थांबवण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान कुठेही असले, तरी ते धर्माच्या नावाखाली एकमेकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !