धर्मांधाकडून हिंदु नाव धारण करून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार !

फेसबुकवरून मैत्री करून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले !

लक्ष्मणपुरी – फिरोजाबाद येथे मोईन खान याने ‘अंश’ हे नाव धारण करून फेसबुकवर एका १६ वर्षीय हिंदु मलीशी मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १ जानेवारी या दिवशी माईन याने या मुलीला भेटण्यासाठी बोलवले आणि नंतर तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला.

१. मुलगी बराच वेळ घरी आली नाही; म्हणून कुटुंबियांनी मुलीचा शोध घेणे चालू केले. तिचा शोध न लागल्यामुळे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यावेळी त्यांनी ‘अंश’ या तरुणावर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले.

२. पोलीस चौकशीच्या वेळी ‘अंश’ हा मोईन खान असल्याचे समोर आले. त्याच्या भ्रमणभाष क्रमांकावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्या वेळी त्याने बलात्कार केल्याची स्वीकृती दिली.

३. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सर्वेश मिश्रा यांनी, ‘सामाजिक माध्यमांवर अनेक जण स्वतःची ओळख लपवून मैत्री करतात, असे समोर आले आहे. त्यामुळे तरुणांनी कुणाशी मैत्री करण्याआधी संबंधिताची ओळख पटवून घ्यावी आणि नंतरच मैत्री करावी’, असे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका 

सामाजिक माध्यमांवरून अशा प्रकारे मैत्री केल्याने पुढे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असे असतांना हिंदु मुली यातून बोध घेतील, तो सुदिन !