
संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या विवाह समारंभात जेवणातून विषबाधा झाल्याने ७०० जणांची प्रकृती बिघडली होती; पण सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यामुळे सर्वजण बचावले. या सर्वांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले. घाटी रुग्णालयात २२ रुग्ण ५ जानेवारीच्या मध्यरात्री ३ वाजता भरती झाले होते. यामध्ये २१ जणांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले असून केवळ १ जण उपचार घेत आहे, तर एम्.जी.एम्. रुग्णालयात ५२ जणांवर उपचार करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाह सोहळा ४ जानेवारी या दिवशी येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलीकडील आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी ठेवली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले आणि काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या आणि मळमळ होणे हे त्रास जाणवू लागले.
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !