बांगलादेशात हिंदु तरुणीचे अपहरण, विवाह, धर्मांतर आणि हत्या !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

ढाका (बांगलादेश) – येथील मुन्शीगंज जिल्ह्यातील श्रीनगर येथील लावण्या राजबंशी (विवाहानंतरचे नाव नुसरत जहाँ) या हिंदु तरुणीची तिचा मुसलमान पती साजू मिया याने हत्या केली. २१ डिसेंबर या दिवशी साजू मिया आणि त्याचे मित्र यांनी या तरुणीचे  अपहरण केले, तिच्याशी विवाह केला आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. विवाहाच्या ३ दिवसांनी साजू मिया याने लावण्याची हत्या केली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.

अल्पवयीन हिंदु मुलीचे मुसलमानांकडून अपहरण : पोलीस निष्क्रीय !

दुसर्‍या घटनेत १५ वर्षीय हिंदु मुलगी शताब्दी बर्मन हिचे १८ डिसेंबर या दिवशी नजमुल आणि त्याचे मित्र यांनी अपहरण केले. शताब्दी ही ढाक्यातील नबीनगर उपजिल्हामधील आशुलिया येथील रहिवासी आहे. तिचे वडील आदित्य बर्मन यांनी आरोप केला आहे की, पोलीस त्यांच्या मुलीला सोडवण्यासाठी काहीही करत नाहीत आणि त्यांच्या मुलीच्या सुटकेसाठी पैशांची मागणी केली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.

संपादकीय भूमिका

जे मुसलमानबहुल बांगलादेशात होते, तेच बहुसंख्य हिंदु असणार्‍या देशातही हिंदु तरुणींच्या संदर्भात होते !