घणसोली येथे धर्मांधांनी हिंदु तरुणीची हत्या करून मृतदेह नदीत फेकला !

नवी मुंबई – घणसोली येथे लग्नाचा तगादा लावणार्‍या हिंदु तरुणीची धर्मांधाकडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघा धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. रियाज खान आणि इम्रान शेख अशी त्यांची नावे आहेत. यांतील रियाज खान याचे मयत तरुणीशी प्रेमसंबंध होते. या तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे त्याने मित्राच्या साहाय्याने दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पनवेल (धामणी) येथील गाढी नदीच्या पुलावरून फेकून दिला. रियाजला ३ बायका असल्याचे समजते.

संपादकीय भूमिका 

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता सरकारने तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करावा !