३ मुलांची आई असणार्‍या विवाहित हिंदु महिलेने विवाह करण्यास नकार दिल्याने विवाहित मुसलमान तरुणाने तिला जाळले !

मोतिहारी (बिहार) – येथे एका विवाहित हिंदु महिलेवर दानिश आलम याने पेट्रोल टाकून तिला जाळल्याची घटना घडली. या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

(सौजन्य : RNA WORLD)

पोलिसांनी दानिश आलम याला अटक केली आहे. दानिश हाही विवाहित असून तो या महिलेवर विवाह करण्यासाठी दबाव टाकत होता. ही घटना देवपूर परसा या गावातील आहे. अर्चना कुशवाह (वय ३५ वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. तिला ३ मुले असून तिचा पती रणधीर कुशवाह चेन्नई येथे कामाला असतो. वर्षांतून २-३ वेळा तो घरी येत असतो. गेल्या दीड वर्षांपासून अर्चना आणि दानिश यांच्यात प्रेमप्रकरण चालू होते.

संपादकीय भूमिका

  • अशा विकृतांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • समान नागरी कायदा नसल्याने मुसलमानांना अनेक विवाह करण्याची अनुमती मिळते आणि त्याचा ते अपलाभ उठवतात, हे लक्षात घ्या !