‘लव्ह जिहाद : एक जागतिक षड्यंत्र’ हा जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला !

‘युवा हिंदु प्रतिष्ठान’च्या वतीने खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे कार्यक्रम !

कार्यक्रमाला उपस्थित धर्मप्रेमी

खामगाव (जिल्हा बुलढाणा) – येथे ‘हिंदु राष्ट्र सेना प्रणित युवा हिंदु प्रतिष्ठान’च्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी श्री मुक्तेश्वर आश्रम येथे ‘लव्ह जिहाद : एक जागतिक षड्यंत्र’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला. या वेळी  हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर, संभाजीनगर येथील सामाजिक समन्वय समितीचे श्री. संजीव जैन, तसेच इतिहासकार आणि लेखक श्री. जगदीशचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ केला. समारोप ‘वन्दे मातरम्’ या गीताने करण्यात आला. कार्यक्रमास खामगाव शहरासह जिल्ह्यातील धर्मबंधू, भगिनी, तसेच मुली उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा हिंदु प्रतिष्ठानच्या धर्मबंधूंनी अथक परिश्रम घेतले.

हिंदु मुलींना फसवल्यास धर्मांधाच्या घरावर मोर्चा काढायला हवा ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर

भ्रमणभाषमध्ये सध्या मुली पुष्कळ ‘रिल्स’ (छोटे व्हिडिओ) बनवत आहेत; पण आता मुलींनी लाठीकाठी शिकणे आवश्यक आहे. मूक मोर्चा, जनआक्रोश मोर्चा हेही पुष्कळ झाले. हिंदु मुलींना फसवल्यास पुढील मोर्चा हा संबंधित धर्मांधाच्या घरावर काढायला पाहिजे.

हिंदु मुलींनो, धर्मांधांच्या आमिषांपासून सावध व्हा ! – संजीव जैन

धर्मांधांची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. विविध माध्यमांतून ते हिंदु महिलांशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतात. हॉटेलिंग, मोटारिंग (गाडीतून फिरणे), थेटरिंग (चित्रपट पहायला नेणे) ही त्यांची आमीष दाखवण्यातील प्रमुख शस्त्रे आहेत.  यापासून हिंदु मुलींनी सावध असावे.

भारतात लव्ह जिहादचे पहिले आक्रमण महंमद बिन कासिमने केले ! – जगदीशचंद्र पाटील

लव्ह जिहादचा इतिहास वर्ष ७११ मध्येच चालू झाला. गांधार प्रदेशातून आमच्या पवित्र भूमीत आक्रमणाचे पहिले पाऊल ठेवणार्‍या महंमद बिन कासिमने राजा दहीरला ठार मारल्यावर त्याच्या दोन लहान मुली कह्यात घेऊन त्या तुर्कस्तानच्या खलिफाला भेट म्हणून पाठवल्या. हे भारतात झालेले लव्ह जिहादचे पहिले आक्रमण होय !