मुसलमान शिक्षिकेला ‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍या मुसलमान विद्यार्थ्याच्या पालकांची शिक्षकेला ठार मारण्याची धमकी

आरोपी विद्यार्थी

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील डॉ. राम मनोहर लोहिया स्मारक इंटर कॉलेज राधना स्कूलमधील मुसलमान शिक्षिकेला अतश, अमन आणि कैफ या तिघा मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. या घटनेचा एक व्हिडिओही प्रसारित झाला होता. या प्रकरणी शिक्षिकेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर यांतील एक विद्यार्थी आणि त्याच्या आरिफ अन् रिजवाना या पालकांनी शिक्षिकेच्या घरी जाऊन तिला तक्रार मागे घेण्यास सांगितले. तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी २ विद्यार्थी आणि एका विद्यार्थ्याची आई यांना अटक केली आहे. आईला नंतर जामिनावर सोडण्यात आले.

संपादकीय भूमिका

यातून लक्षात येते की, बहुतांश मुसलमानांमध्ये गुन्हेगारी मानसिकता कुठून निर्माण होते ! पालकच असे असतील, तर मुले मोठे झाल्यावर वेगळे काय करणार ? ‘याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे’, असे किती निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना वाटते ?