बलारामपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्य्रासह चौघांना अटक

बलारामपूर (छत्तीसगड) – येथील पहाडखडवा गावामध्ये हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. रात्रीच्या अंधारात हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. यात मृत व्यक्तीला जिवंत करण्याचाही दावा केला जात होता. याची माहिती गावकर्‍यांना मिळाल्यावर ४ जणांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. यात एका पाद्य्राचाही समावेश आहे. धर्मांतराच्या विरोधात हिंदूंच्या संघटनांनी येथे रस्ता बंद आंदोलनही केले. भाजपचे नेते प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांतरविरोधी कायदा कधी होणार ?