माझ्याशी निकाह न केल्यास जिवंत गाडून टाकीन !

सलमान याची अल्पवयीन हिंदु मुलीला बंधक बनवून धमकी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील सलमान नावाच्या धर्मांधाने एका अल्पवयीन हिंदु मुलीला बंधक बनवून ‘माझ्याशी निकाह कर, अन्यथा जिवंत गाडून टाकीन’, अशी धमकी दिली. लक्ष्मणपुरी येथील रहिवासी असलेल्या पीडितेला सलमानने १३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पळवून हरियाणातील एका चाळीत नेले. तेथे त्याने तिला बंधक बनवले. ही माहिती मिळताच पोलिसांनी हरियाणा येथे धाड टाकून सलमानच्या मुसक्या आवळल्या, तसेच पीडितेची सुटका करून तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादमुळे अनेक हिंदु मुली आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतांना सरकारी यंत्रणा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बघत बसतात, हे लक्षात घ्या !