हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन आणि चंद्रपूर, नागपूर येथे आंदोलन !

महाराष्ट्रातील कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालये यांच्या तपासणीसाठी ‘विशेष अन्वेषण पथक’ नेमण्याची मागणी

निवेदन स्वीकारतांना वर्धा येथील जिल्हाधिकारी

वर्धा, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – सध्या ‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे पहाता हिंदु मुलींच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्‍यांच्याद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नुकतेच निवेदन सोपवण्यात आले. यासमवेतच महाराष्ट्रातील सर्व कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालये यांमध्ये अत्याचार होतात का ?, हे पडताळण्यासाठी ‘विशेष अन्वेषण पथक’ नेमून शाळांची चौकशी करण्यात यावी, यासाठीही निवेदन देण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखा आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

चंद्रपूर येथे आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

वरील मागणी चंद्रपूर येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे केली. या आंदोलनात भाजप, विश्व हिंदु परिषद, आर्य समाज, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती यांसह धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सहभाग घेतला.

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

नागपूर येथे आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

नागपूर – हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने येथील संविधान चौकात वरील मागण्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे आनंद राठी, योग वेदांत सेवा समितीचे प्रदीप देशपांडे, ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’चे राजकुमार मिश्रा, शिवसेनेचे अशोक लिखिते, रणरागिणी शाखेच्या सौ. नमिता काकडे, संवर्धिनी न्यास संस्थेच्या डॉ. अभिलाषा घनोटे, डॉ. शुभांगी देशपांडे आदी हिंदुत्वनिष्ठ, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाला संबोधित करतांना ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’चे सभापती श्री. राहुल पांडे म्हणाले, ‘‘प्रेमाच्या नावाने हिंदु तरुणींशी ‘लव्ह जिहाद’ करण्यात येत आहे. याचा सर्व हिंदूंना संघटितपणे सामना करावा लागेल.’’