विद्यार्थीनीवर बलात्कार करणार्‍या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रूहाब मेमन या माजी पदाधिकार्‍याला अटक

एन्.एस्.यु.आय.चा माजी प्रदेश सरचिटणीस रूहाब मेमन (मध्यभागी )

कांकेर (छत्तीसगड) – येथे काँग्रेसची विद्यार्थी संघटना एन्.एस्.यु.आय.चा माजी प्रदेश सरचिटणीस रूहाब मेमन याला एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रूहाब याने या विद्यार्थिनीला महाविद्यालयात प्रवेशासाठी साहाय्य करण्याच्या नावाखाली तिच्याशी मैत्री केली आणि नंतर एक दिवस जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. रूहाबला काँग्रेसने भानु प्रतापपूर येथील पोटनिवडणुकीचे दायित्व दिले होते. एन्.एस्.यु.आय.ला रूहाबच्या वाईट स्वभावाविषयी ठाऊक झाल्यानंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून संघटनेतून निलंबित करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !