बीड – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बीड येथे २० नोव्हेंबर या दिवशी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने १६ नोव्हेंबर या दिवशी सुभाष रोड येथील दत्त मंदिरात शहरातील उद्योजकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सभा यशस्वी करण्यासाठी विविध माध्यमातून साहाय्य करण्याचा उपस्थितांनी निर्धार केला. या वेळी व्यापारी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष संतोष जग्गन्नाथ सोहनी, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे, रामेश्वर कासट, किशोर शर्मा, विशाल पडियार, अक्षय लड्डा, प्रशांत आंबेकर, सचिन लड्डा, सुरेश साळुंके, अशोक मंत्री, रामप्रसाद बियाणी, मयंक पढियार, जितेंद्र पढियार, जयकिशोर बियाणी ज्ञानेश्वर खापे, संजय शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. विनोद रसाळ, श्री. विक्रम घोडके, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांसह अन्य उद्योजक उपस्थित होते.
१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण भाजपचे आमदार सुरेश धस यांना देण्यात आले. या वेळी आमदार सुरेश धस यांनी सभेला परवानगी मिळण्यासाठी साहाय्य केले.
२. सभा निर्विघ्नपणे आणि यशस्वीरित्या पार पडावी यासाठी कंकालेश्वर मंदिरात प्रार्थना आणि आरती करण्यात आली, तसेच श्रीक्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके आणि सौ. सुनिता पंचाक्षरी यांनी सभेचे निमंत्रण दिले.