लोकशाहीमुळे देशाची पराकोटीची अधोगती कशी झाली याची आणखी उदाहरणे म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात असणे !

‘सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे. यावर वेळीच कारवाई न झाल्यास भविष्यात अफझलखानाच्या थडग्याच्या भोवतालच्या अनधिकृत बांधकामांप्रमाणे हे प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ही सर्व अवैध बांधकामे उघडपणे चालू असूनही, तसेच याविरोधात वेळोवेळी तक्रारी देऊनही पुरातत्व विभागाकडून यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.’ (११ नोव्हेंबर २०२२)