यंदाचा ‘पुलोत्सव’ हा ‘ग्लोबल पुलोत्सव’ म्हणून साजरा करणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

पुणे – महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक पु.ल. देशपांडे यांच्या ‘आशय सांस्कृतिक’च्या वतीने ‘पु.ल. परिवारा’च्या साहाय्याने आयोजित करण्यात येत असलेला ‘पुलोत्सव’ आता ‘ग्लोबल पुलोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा ‘पुलोत्सव’ ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये जगभर साजरा होणार असून देशातील २३ शहरांसह ५ खंडांतील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे निमंत्रक या नात्याने दिली.

पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर या शहरांसह देशातील इंदौर, बडोदा, बेंगळूरू, भाग्यनगर (हैदराबाद), देहली, कर्णावती आदी शहरांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. जगभरामध्ये लंडन, म्युनिच, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, कतार, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, जोहान्सबर्ग, सिडनी, ऑकलंड आदी शहरांमध्ये महोत्सव साजरा होणार आहे.