७ व्या शतकातील राजकीय कट्टरतावादाची युद्धपिपासू वृत्ती आजही तशीच ! – गीर्ट विल्डर्स

गीर्ट विल्डर्स, खासदार, नेदरलँड्स

ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) – पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे. हिंसात्मक आक्रमणे आणि धमक्या या पाकिस्तानात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येत आहेत. ७ व्या शतकापासून राजकीय आणि धार्मिक कट्टरतावादाचा मूर्खपणा अन् युद्धपिपासू वृत्ती दुर्दैवाने आजही तशीच आहे. त्यात कोणताही पालट झालेला नाही, अशी प्रतिक्रिया नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली.