जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु धर्मसेना’ आयोजित हिंदु धर्मजागृती सभा !

जबलपूर – बांगलादेशातील ढाका शहरात ‘ढाकेश्वरी’ हे शक्तीपीठ आहे. लाहोर लव-कुश यांचे शहर आहे. देशाच्या फाळणीमुळे भारताबाहेर गेलेल्या या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते तथा आमदार श्री. रामेश्वर शर्मा यांनी केले. ते येथील काली माई मंदिर परिसरात हिंदु धर्मसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला संबोधित करत होते.

या वेळी हिंदु धर्मसेनेचे संस्थापक श्री. योगेश अग्रवाल म्हणाले की, शस्त्रपूजा आपली प्राचीन सनातन परंपरा आहे. ही विद्या शिकणे आणि स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेले उद्बोधन
१. श्री. अजय बिश्नोई, आमदार, भाजप – हिंदु धर्म एक मात्र वैज्ञानिक धर्म आहे. आमच्या तिथी, पंचांग, कालगणना या अत्यंत शास्त्रीय आहे. भविष्यात ग्रहस्थिती कशी असेल, हे या पंचांगावरून आज सांगता येते. ही वैज्ञानिक परंपरा आपण पुढे नेली पाहिजे.
२. डॉ. जितेंद्र जामदार, उपाध्यक्ष, मध्यप्रदेश जनअभियान परिषद – देश आणि धर्म विरोधी शक्तींच्या विरोधात हिंदूंना संघटित व्हायला हवे.
३. सौ. लतासिंह ठाकूर, अध्यक्षा, चंडी वाहिनी – सध्याची परिस्थिती पहाता युवतींनी लव्ह जिहादला बळी न पडता स्वसंरक्षणासाठी तत्पर असायला हवे.
४. श्री. अनिल तिवारी, विवेकानंद युनिव्हर्सिटी – अहिंसा हे थोतांड आहे. अहिंसेचे धडे देऊन आपल्यातील शौर्य नष्ट करण्यात आले. आत्मरक्षणासाठी आपण तत्पर असायला हवे.

भक्तीसह शक्तीची उपासना करणे काळाची आवश्यकता ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

असुरांच्या संहारासाठी श्री दुर्गादेवी प्रकट झाली आहे. तिच्या सर्व हातांमध्ये शस्त्र आहेत. आज भक्तीसह शक्तीची उपासना करणे काळाची आवश्यकता आहे. या नवदुर्गेला युवतींनी मनामध्ये धारण केले, तर लव्ह जिहादींची हिंदु मुलींकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही. आज युवतींनी दांडियासह दंडही हातात धरायला हवा. हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्चित होईल.
________________________________
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन