
कोलकाता – कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला. कोलकाता पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शुभेंदू अधिकारी यांनी दावा केला आहे की, मोमीनपूरमधील हिंसाचाराच्या कालावधीत ५ सहस्र हिंदूंनी कोलकाता येथून पलायन केले आहे. या प्रकरणी शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभेपासून राजभवनापर्यंत मोर्चा काढला आणि नंतर राज्यपालांना निवेदन सादर केले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून केंद्रीय पोलीस दल तैनात करण्याची मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना शुभेंदू अधिकारी म्हणाले की, त्यांनी कोलकाता पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हिंसाचारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. हिंसाचारात घायाळ झालेले ३ पोलीस अधिकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !