हवाई सुंदरीवर (‘एअर होस्टेस’वर) बलात्कार करणार्‍या काँग्रेस नेत्याला अटक

नवी देहली – देहलीतील महरौली भागात काँग्रेसचा ब्लॉक प्रमुख हरिजीत यादव याने एका हवाई सुंदरीवर (‘एअर होस्टेस’वर) बलात्कार केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. या वेळी पीडितेने यादव याला घरातच बंद करून पोलिसांना दूरभाष करून बोलावल्यावर यादव याला अटक करण्यात आली. पीडिता यादव याला गेल्या दीड मासापासून ओळखत होती.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !