(म्हणे) ‘आम्हाला भारतासमवेत शांततापूर्ण संबंध हवेत; मात्र काश्मीरचा प्रश्‍न सोडवावा !’

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकच्या पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका उघड !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानला भारतासमवेत शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत म्हटले; मात्र त्याच वेळी त्यांनी काश्मीर प्रश्‍नाचाही उल्लेख केला.

पंतप्रधान शरीफ म्हणाले की,

१. सर्व शेजारी राष्ट्रांसमवेत आम्हाला शांततापूर्ण संबंध हवे आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. दक्षिण आशियामध्ये दीर्घकालीन शांततापूर्ण वातावरण असावे, अशी आमची भूमिका आहे; मात्र त्यावेळी आम्ही जम्मू-काश्मीर वादावर तोडगा काढण्याच्या मागणीचेही पुरस्कर्ते आहोत.

२. रचनात्मक सहभागासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी भारताने विश्‍वासार्ह पावले उचलायला हवीत. (भारताने नाही, तर पाकने पावले उचलायला हवीत आणि ती जगाला दिसलीही पाहिजेत ! – संपादक) आपण एकमेकांचे शेजारी आहोत आणि आपण कायम शेजारी रहाणार आहोत. आपण शांततेत रहायचे कि एकमेकांशी लढत रहायचे, हा निर्णय आपला आहे. (हा निर्णय भारताचा नाही, तर पाकने घ्यायला हवा ! – संपादक)

३. वर्ष १९४७ पासून आजपर्यंत आमच्यात ३ युद्धे झाली आहेत. या युद्धाचा परिणाम म्हणून दोन्ही देशांमध्ये केवळ दुःख, गरिबी आणि बेरोजगारी वाढली आहे. (ही युद्धे भारताने नाही, तर पाकने चालू केली आणि या युद्धांमध्ये त्याचा दारुण पराभव झाला आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! – संपादक) शांततापूर्ण वाटाघाटी आणि चर्चेद्वारे आमचे मतभेद, समस्या सोडवणे आता आपल्यावरच अवलंबून आहे.

संपादकीय भूमिका

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे ज्या वेळी पाकिस्तान मान्य करील आणि तेथील जिहादी आतंकवाद थांबवेल, तेव्हाच पाकसमवेत शांततापूर्ण संबंध निर्माण होतील, हे पाकने कायम लक्षात ठेवावे !