दहशतीखाली असल्याने हिंदू घरातही धार्मिक चिन्हे लावण्यास घाबरत आहेत !

लिसेस्टर (ब्रिटन) – शहरात पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर गेल्या काही दिवसांत केलेल्या आक्रमणांमुळे तेथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ९ हिंदु कुटुंबियांनी या शहरातून पलायन केले आहे. कट्टरतावादी मुसलमानांच्या दहशतीमुळे तेथील हिंदू त्यांच्या घरांमध्ये धार्मिक चिन्हे लावूू शकत नाहीत, असे ‘हेनरी जॅक्सन रिसर्च’च्या ‘फेलो’ शार्लोट लिटिलवूड यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. (हे एक विदेशी महिलेकडून हिंदूंना कळते, हे ब्रिटनमधील हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)
‘Let’s clean them from Leicester as we did from Kashmir’: Hindu families leaving amid threat messages from Islamistshttps://t.co/ac0bebXr8K
— OpIndia.com (@OpIndia_com) September 22, 2022
(म्हणे) ‘काश्मीरप्रमाणे कुत्र्यांना (हिंदूंना) हाकलून लावा !’ – मुसलमानांचे चिथावणीखोर आवाहन
लिटिलवूड पुढे म्हणाल्या की, आम्ही लिसेस्टरच्या रस्त्यांवर हिंसाचार पाहिला. त्यासाठी कट्टरतावाद्यांना आवाहन करण्यात आले होते. रस्त्यावर २०० जण उतरले होते. यातील अर्ध्याहून अधिक शहराच्या बाहेर आले होते. यासाठी सामाजिक माध्यमांतून अनेक पोस्टस करण्यात आल्या होत्या. यात हिंदूंना कापणे, तसेच त्यांना नष्ट करणे अशी चिथावणीखोर आवाहने करण्यात आली होती. या पोस्टमध्ये म्हटले होते, ‘ज्या प्रमाणे आपण काश्मीरमधून हिंदूंना संपवले, तसेच येथेही करा. या कुत्र्यांना (हिंदूंना) चिरडा. हाकलून लावा.’ अशा प्रकारच्या पोस्ट करणे दुःखद आहे. इस्लामी कट्टरतावादी समुहाने हे नियोजितरित्या केले आहे. याचे नेतृत्व यूट्यूब वर लाखो समर्थक असणार्यांनी केले आहे. त्यांनी मुसलमानांना लिसेस्टरमध्ये बोलावले होते. आता त्यांचे पुढील लक्ष्य लंडनमधील भारतीय दूतावास असू शकते.
संपादकीय भूमिका
|
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित