गायीचीही चाकूने भोसकून हत्या !
अमरावती – शहर आणि जिल्ह्यातून तडीपार एका गुन्हेगाराने २ साथीदारांसह नागपूर मार्गावरील एका उपाहारगृहातील चौकीदार जंग बहादूर राठोड यांच्यावर चाकूने जीवघेणे आक्रमण केले. त्यानंतर त्याने व्यंकय्यापुरा येथे गायीची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना २० सप्टेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. गोंडी उपाख्य सोनू उपाख्य ऋषिकेश मोडक, विशाल राजपूत आणि शेख असीम शेख मुख्तार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
१. गोंडी याला ६ मासांपूर्वी जिल्ह्यातून तडीपार केले होते; मात्र तो आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला होता. (शहरात आल्यावर पोलिसांनी त्याला लगेच का पकडले नाही ? पोलीस झोपले होते का ? – संपादक)
२. गायीच्या हत्येप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गोंडीसह त्याच्या २ साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
३. ‘गोंडी हा फ्रेजरपुरा ठाण्याच्या क्षेत्रातील सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपार केले असतांनाही त्याचे वास्तव्य शहरात आहे. तो खुलेआम चाकू वापरतो आणि आक्रमणे करतो’, ही गंभीर गोष्ट असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी फ्रेजरपुरा ठाण्यातील गुप्त शाखेचे पथक विसर्जित करून त्या पथकातील सर्व पोलिसांना पोलीस मुख्यालयात हालवले आहे. (अशा पोलिसांना पोलीस मुख्यालयात हालवल्यामुळे त्यांच्या वृत्तीत काहीच फरक पडणार नाही, हे पोलीस आयुक्त्यांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांवरच कठोर फौजदारी कारवाई केली पाहिज ! – संपादक)
संपादकीय भूमिकानिष्क्रीय पोलीस यंत्रणा ! |