इतर पंथ आणि श्राद्ध

प्रश्न : श्राद्ध करणे, हे हिंदूंनाच बंधनकारक आहे का ? पाश्चात्त्य देशांमध्ये त्यांचा देव (गॉड) त्यांना पीडा देत नाही का ?

उत्तर : इतर सर्व उपासना संप्रदाय आहेत. त्या संप्रदायानुसार श्राद्ध नसले, तरी त्या मृत व्यक्तीच्या थडग्याजवळ बसून ते प्रार्थना करतात. हा श्राद्धाचाच एक प्रकार आहे.

(देव कुणालाही पीडा देत नसून पूर्वजांना गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्मात अतीसखोल असा अभ्यास झाल्याने हे सर्व शास्त्रविधी पूर्वापार केले जात आहेत आणि ते शास्त्रशुद्धरित्या केल्याने पूर्वजांचा त्रास अल्प झालेली सहस्र उदाहरणे आहेत. – संपादक)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)