समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांचे आवाहन !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – यापूर्वीही २ दलित तरुणींवर बलात्कार झाला होता आणि त्यांचे मृतदेह झाडावर लटकवलेल्या स्थितीत आढळले होते. जेव्हा आरोपींनी गुन्हा केला, तेव्हा त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणे आवश्यक होते. आताही जर आरोपी मुसलमान आहेत, तर शरीयत कायद्यानुसार त्यांना भर चौकात कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांना दगड मारून ठार केले पाहिजे. म्हणजे नंतर कुणी अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील समाजवादी पक्षाचे खासदार सैय्यद तुफैल हसन (एस्.टी. हसन) यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील लखीमपूर खिरी येथे अल्पवयीन दलित मुलींवर झालेल्या बलात्काराच्या आणि त्यांच्या हत्येच्या प्रकरणी ते बोलत होते. या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात ५ मुसलमान, तर १ हिंदू आहे.
Lakhimpur Kheri case: SP MP ST Hasan bats for ‘stoning’ under Sharia law as punishment for the rapists#LakhimpurKheri #SamajwadiPartyhttps://t.co/bZ0S3LLSBq
— TIMES NOW (@TimesNow) September 18, 2022
संपादकीय भूमिका‘सनातन प्रभात’ गेल्या अनेक मासांपासून ‘अशा प्रकारची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये,’, असे जे सांगत होते, तिच मागणी खासदार एस्.टी. हसन आता करत आहेत, हे लक्षात घ्या ! |
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !