भाग्यनगर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

प्रतीकात्मक छायाचित्र

भाग्यनगर – शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या पालकांनी १३ सप्टेंबर या दिवशी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी २ दिवसांपूर्वी १४ वर्षांच्या मुलीला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर २ दिवस बलात्कार केला. आरोपींच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. २८ मे २०२२ या दिवशी भाग्यनगरच्या जुबली हिल्समध्ये एका १७ वर्षांच्या मुलीवर चारचाकी गाडीमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.