(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

गौहत्ती (आसाम) – राज्यात मौलवींच्या वेशात आतंकवादी लपले आहेत आणि ते देशविरोधी कारवाया करत आहेत, असे विधान आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी केले आहे. त्यांनी राज्यातील विविध इस्लामी संस्थांच्या प्रमुखांशी भेट घेऊन त्यांना आतंकवाद्यांचा उघडे पाडण्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले. (जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या इस्लामी संस्थांवरही कारवाई झाली की, अन्य संस्था आपसूकच पोलिसांना साहाय्य करतील ! – संपादक) गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यात अल्-कायदा आणि ‘अंसारुल्लाह बांग्ला टीम’ या आतंकवादी संघटनांशी संबंधित काही आतंकवाद्यांना अटक केलेली आहे. एकूण ३८ जणांना अटक करण्यात आलेली आहे. हे आतंकवादी आसाममधील मशिदींमध्ये इमाम किंवा मौलवी यांचे काम करत होते. त्या पार्श्वभूमीवर महंता यांनी आवाहन केले आहे.
असम के डीजीपी ने मदरसों से की धर्मनिरपेक्ष शिक्षा की अपील; इस्लामिक निकायों से मांगा समर्थन https://t.co/KoCmEv5sHx
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) September 4, 2022
संपादकीय भूमिका‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता काहीच बोलत नाहीत; कारण त्यांचा खोटारडेपणा केव्हाच उघड झाला आहे. हिंदूंना आणि त्यांच्या संतांना ‘आतंकवादी’ ठरणारे राजकीय पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत, हे लक्षात घ्या ! |
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !