संभाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळांतील मुले शाळा सोडून मदरशात जायला लागल्याचा धक्कादायक प्रकार !

प्रतीकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – जिल्ह्यातील काही गावांतील मुले शाळेत न येता मदरशात जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांचे सर्वेक्षण करतांना शिक्षण विभागातील अधिकर्‍यांच्या लक्षात आले आहे. यामुळे शाळांतील उपस्थिती न्यून होत असल्याने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी ‘शाळेत न येता परस्पर मदरशांत जात असलेल्या विद्यार्थ्यांची सूची २ दिवसांत करा’, असा आदेश जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकार्‍यांना ३० ऑगस्ट या दिवशी दिला.

१. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४ सहस्र ६०२ शाळांपैकी तब्बल ४४३ शाळा ऊर्दू माध्यमाच्या असून त्यात १८ लाख ४१९ विद्यार्थी शिकतात.

२. कोरोना महामारीच्या गंभीर स्थितीमुळे १ सहस्र २४४ मुले काही कारणामुळे शाळाबाह्य झाली, असे लक्षात आले; मात्र ही मुले मदरशात शिक्षण घेत असल्याचे नंतर आढळले.

संपादकीय भूमिका

मदरशांमध्ये इस्लामी आतंकवादाचे धडे दिले जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. हे पहाता या गंभीर प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक !