
गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), २५ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत. तरी प्रशासनाने या उत्सवास कोणतेही छुपे नियम आणि अटी घालू नयेत. गणेशोत्सव गणेश भक्तांना मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा करण्यास अनुमती द्यावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेना तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, सर्वश्री पोपट दांगट, विक्रम चौगुले, संदीप दळवी, राहुल गिरूले, दीपक अंकल, जितेंद्र कुबडे यासंह अन्य उपस्थित होते.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !