झारखंडमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उघड

रांची (झारखंड) – झारखंडच्या दुमका जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून शाहरूख हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना नुकतीच घडली. याआधी त्याने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीला फुलो झानो वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुलीचे शरीर ९० टक्के भाजले आहे, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपी शाहरुख हुसेनला अटक केली आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार शाहरूख हुसेन नावाचा बांधकाम कामगार त्याच्या शेजारी रहाणार्या हिंदु मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो पीडित मुलीला जाता-येता त्रास द्यायचा. त्याने कुठून तरी तिचा भ्रमणभाष क्रमांक मिळवला. भ्रमणभाषवरून तो तिला धमकावत होता आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होता. २३ ऑगस्टला पहाटे पीडित हिंदु मुलगी तिच्या घरी झोपली होती. तेव्हा शाहरूख हुसेन तिच्या घरी आला आणि त्याने खिडकीतून पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. घाबरून तिने वडिलांच्या खोलीत धाव घेतली. कुटुंबियांनी आग विझवली आणि तिला रुग्णालयात भरती केले.
संपादकीय भूमिकादेशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या घटना घडत असतांनाही त्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा काहीही न करता हतबलतेने पहात बसतात, हे लक्षात घ्या ! हिंदु स्त्रियांच्या रक्षणासाठी हिंदूंनी आता तरी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे ! |
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena