तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याने काश्मीरमध्ये हिंदु भावांवर केले आक्रमण !

जिहादी आतंकवादी संघटना ‘कश्मीर फ्रीडम फायटर्स’ची स्वीकृती

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथे १६ ऑगस्ट या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी सुनीलकुमार भट आणि त्याचा भाऊ यांच्यावर गोळीबार केला होता. यात सुनीलकुमार यांचा मृत्यू झाला, तर पिंटूकुमार भट यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या आक्रमणाचे दायित्व जिहादी आतंकवादी संघटना ‘के.एफ्.एफ्.’ने (‘कश्मीर फ्रीडम फायटर्स’ने) घेतली आहे. या संघटनेने म्हटले आहे, ‘हे दोघे भाऊ तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी आवाहन करत होते. त्यामुळेच त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.’ सुनीलकुमार यांच्यावर आक्रमण करण्यापूर्वी आतंकवाद्यांनी त्यांचे नाव विचारले होते.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये कलम ३७० रहित करण्यात आले आहे, तसेच प्रतिदिन आतंकवाद्यांना ठार केले जात आहे. तरीही तेथील हिंदुद्वेषी जिहादी आतंकवाद संपत नाही. तो संपवण्यासाठी पाकला आणि काश्मीरमधील जिहादी मानसिकतेला संपवणे आवश्यक !