बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली !

कावड यात्रा

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील हाफीजगंज भागातील बकैनिया गावचे प्रधान इकरार अहमद यांच्या घरासमोर ७ ऑगस्टच्या सायंकाळी दुचाकींवरील तरुणांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली. यात २ यात्रेकरून घायाळ झाले. यात्रेकरूंना लाथ मारून पळ काढणार्‍या या तरुणांना लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता, मुसलमानांनी घराच्या छतांवरून यात्रेकरूंवर दगडफेक केली.

या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाल्याने ३ घंटे वाहतूक खोळंबली होती. या हिंसाचाराच्या वेळी २-३ पोलीस किरकोळ घायाळ झाले, तर पोलीस निरीक्षकांचा गणवेश फाडण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मुरादाबाद येथेही मुसलमानांकडून दगडफेक

मुरादाबाद येथील करनपूरमध्ये कावड यात्रेकरूंवर मुसलमान मुलांनी घराच्या छतावरून दगडफेक केली. यामुळे कावड यात्रेकरूंनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. (मुसलमान मुलांनाही ही शिकवण अशी शिकवण दिली जात असेल, तर ते मोठे झाल्यावर वेगळे काय करणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांध सातत्याने कावड यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस कसे दाखवतात ? काँग्रेस आणि अन्य हिंदु विरोधी राजकीय पक्षांच्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असते, याची यावरून कल्पना येते !