शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी मदरशांमध्ये म्हशीची हत्या करणार्‍या चौघांना अटक

शाहजहापूर (उत्तरप्रदेश) – येथील मोहल्ला पट्टी या गावातील सरकार अनुदानित मदरशामध्ये म्हशीची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शादान कुरेशी, आमिर, बाबर आणि मौलाना (इस्लामचा अभ्यासक) वसीउद्दीन यांंना अटक केली. तसेच यात काही महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी येथून एक क्विंटल मांस जप्त केले आहे.

संपादकीय भूमिका

  • सरकारने ‘आता मदरशांना अनुदान द्यायचे का ?’ हे ठरवण्याची वेळ आली आहे. हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी हे थांबवण्यासाठी आता सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
  • आसाममधील भाजपच्या सरकारने राज्यातील ८०० मदरसे बंद केले आहेत, तर आता उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना त्याने स्वतःहून असा निर्णय घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !